चाळीसगाव,(प्रतिनिधी)- चाळीसगाव शहरातून शाळेत गेलेले दोन सख्खे भाऊ दिनांक १३ डिसेंबर रोजी बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.१३ रोजी घडली. रुद्र किरण सोनवणे (वय ६ वर्ष ) व आर्यन किरण सोनवणे (वय ११ वर्ष) अशी बेपत्ता झालेल्या मुलांची नावे आहेत.
याबाबत सविस्तर असे की,वडील किरण भावलाल सोनवणे (मिलिंदनगर, चाळीसगाव) हे ऊसतोड कामासाठी भुसावळ गेले असता दोघं मुलं शाळेत गेलेले होते ते दोघे सख्खे भाऊ शाळा सुटल्यानंतर घरी परतलेच नाहीत. या दोघांना अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसांत सोमवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून, पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत
दोन्ही मुले रुद्र व आर्यन हे सकाळी त्यांच्या धुळे रोडवरील प्राथमिक विद्यालयात गेली होती. सायंकाळी ती घरी आलीच नाहीत, असे वडिलांना त्यांच्या बहिणीने फोन करून सांगितले.त्यानंतर शोधाशोध करूनही ती सापडले नाहीत. वडील किरण सोनवणे यांनी चाळीसगाव शहर पोलिसांत मुलगा रुद्र व आर्यन यांना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद दिली आहे.अज्ञात व्यक्तीविरोधात भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल झाला