जळगाव येथील तरुणाने पाकिस्तानातील हस्तकालागोपनीय माहिती पुरविल्या प्रकरणी एकास अटक करण्यात आले असून ATS पथकाच्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.
भारतातील प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर विभागातील हस्तकाला देणारा गौरव पाटील (२३) हा मूळ जळगाव येथील राहणारा आहे. त्यास राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली असून त्याने मुंबईच्या नेव्हल डॉक यार्डमध्ये सहा महिन्यांचे शिकाऊ शिक्षण घेतले होते.
एक संशयित पाकिस्तानातील गुप्तचर विभागातील हस्तकाला भारतातील प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती देत असल्याची माहिती ATS पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक पुराव्याच्या मदतीने गौरव यास ताब्यात घेत चौकशी केली. तेव्हा, एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत फेसबुक व व्हॉट्सअॅपद्वारे पाकिस्तानातील दोन हस्तकांशी त्याने ओळख केली याचं ओळखीतून त्याने गोपनीय व संवेदनशील माहित पुरवली.
या माहितीच्या बदल्यात त्याने पैसे स्वीकारल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार, पाटीलसह त्याच्या संपर्कात असलेल्या तिघांविरोधात एकूण चार जणांविरुद्ध यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे. तिसऱ्या व्यक्तीबाबत अधिक तपास सुरू आहे. पाटीलला अटक करण्यात आली आहे.पैसे स्वीकारल्याचे तपासात समोर
गौरव याने आयटीआयचे शिक्षण घेतले. पुढे नेव्हल डॉक यार्डमध्ये त्याने ६ महिन्यांची अॅप्रेंटिसशिप केली होती. येथूनच त्याने महत्त्वपूर्ण माहिती शेअर केल्याचा संशय एटीएसला आहे. तो ठाणे परिसरात भाडेतत्त्वावर एकटाच राहण्यास होता.
हे सुद्धा वाचा….