नवी दिल्ली – संसदेत चर्चा सुरु असताना आज बुधवार दिनांक १३ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास लोकसभेच्या गॅलरीत बसलेले दोन तरुण गॅलरीत लटकून खाली उतरले आणि त्यांनी अचानक स्मोक क्रॅकर्स उडवले अचानक घडलेल्या याप्रकारामुळं संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिले आहे.या घटनेने काही काळ संसदेत खळबळ उडाली .दरम्यान यातील एक जण महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील २५ वर्षीय युवक अमोल शिंदे याचा समावेश आहे.
दरम्यान या घटनेची रिपोर्टिंग लाईव्ह करणाऱ्या टीव्ही पत्रकारांमध्ये यावरुन झालेल्या वादाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे हा व्हिडीओ पहिल्यानंतर अनेक जन या पत्रकारांना ट्रोल करतांना दिसत आहे.एकीककडं संसदेत झालेल्या घुसखोरीमुळं संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघालेले असताना दुसरीकडं स्मोक क्रॅकर च्यां खाली बॉटल दाखवून लाईव्ह रिपोर्टींगसाठी मला दे… मला दे… करतांना पत्रकारांमध्ये वाद चर्चेचा विषय बनला आहे.
Security gayi tel lene, Indian media is fighting for smoke canisters. ???? pic.twitter.com/qQ3YbFTyMB
— Narundar (@NarundarM) December 13, 2023
संसंद भवनात धुराच्या नळकांड्या पेटवणाऱ्या चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.
नीलम, अमोल शिंदे, सागर शर्मा आणि मनोरंजन डी अशी संसदेच्या आत आणि बाहेर गोंधळ घालणाऱ्या चार आरोपींची नावे आहेत. यातील नीलम हिसार, हरियाणाची रहिवासी असून तिचे वय 42 वर्षे आहे. अमोल शिंद हा महाराष्ट्रातील लातूरचा रहिवासी असून त्याचे वय 25 वर्षे आहे. तर सागर शर्मा आणि मनोरंजन डी हे कर्नाटकचे रहिवासी आहेत.
राहुल गांधी होते सभागृहात उपस्थित
संसंद भवनात धुराच्या नळकांड्या पेटवून हल्ला झाला आणि सभागृहात गोंधळ उडत असतांना खासदार राहुल गांधींही संसदेत उपस्थित होते. राहुल गांधी त्यांच्या जागेवर उभेही राहिले आणि संपूर्ण घटनाक्रम बघत होते. लोकसभेत गोंधळ सुरू होता तेव्हा राहुल गांधी त्यांच्या जागेवरून एक इंचही हलले नाहीत.यावेळेसचा राहुल गांधी यांचा फोटो ट्विट करून ‘डरो मत, कहते ही नही, करके भी दिखाते है… असं ट्विट केलं आहे.
डरो मत ????????
कहते ही नहीं, करके भी दिखाते हैं ????@RahulGandhi pic.twitter.com/uvu39GzEj0
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) December 13, 2023
हे सुद्धा वाचा….