पाचोरा(किशोर रायसाकडा)- व्यक्ती जिवंत असतांना सातबारा उताऱ्यावर मयत नोंद असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून या प्रकाराने महसूल विभागाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. याबाबत सविस्तर असे की,पाचोरा शहरातील नामांकित वकील दिपक विठ्ठल पाटील यांनी स्वमालकीच्या प्लॉटचा उतारा काढला असता त्यांना स्वतःचेच नावाची नोंद ‘मयत’ असल्याचे दिसून आले ह्यायातीत असतांना चक्क त्यांना महसूल विभागाच्या सातबारा उताऱ्यावर स्वतःचे नाव ‘मयत नोंद पाहून कायदेतज्ज्ञ दीपक पाटील यांना धक्काचं बसला.
याबाबत सविस्तर की, पाचोरा येथील अॅड. दिपक विठ्ठल पाटील हे पाचोरा न्यायालयात वकिली व्यवसाय करतात. ५ डिसेंबर रोजी ते आपल्या नावे असलेल्या पुनगाव रोडवरील बक्कळ प्लाॅट गट क्रमांक ९६ / २ / १३२ हा सात / बारा उतारा काढण्यासाठी शहरातील आँनलाईन सेंटर वर गेले असता आॅनलाईन सेंटर धारकाने त्यांच्या नावे असलेल्या बक्कळ जागेचा उतारा हातात दिला असता तो उतारा बघुन दिपक पाटील यांना चक्क धक्काच बसला.
सातबारा उताऱ्यावर चक्क या वकील महाशयांना जिवंतपणीच महसुल प्रशासनाच्या भोंगळ कारभाराने २८ आॅगस्ट २०२० रोजी चक्क मयत असल्याची नोंदच आॅनलाईन दप्तरी झाली असल्याने या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. कायदेतज्ञ अॅड. दिपक पाटील यांच्या वर हा प्रसंग ओढवला तर इतर सर्व सामान्यांचे काय ? असा प्रश्न जन सामान्यां मधुन उपस्थित केला जात आहे.
आॅनलाईन सेवा ही नागरिकांसाठी “घंटो का मिनिटो मे” अशा पद्धतीने असली तरी आॅनलाईन पद्धतीचा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मनस्ताप देखील सोसावा लागत असल्याचे हे जिवंत उदाहरण पाचोऱ्यात बघावयास मिळाला आहे.
मंडळअधिकारी काय म्हणाले
मंडळ अधिकारी वरद वाडेकर यांच्याशी याबाबत या विषयी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, सदरचा प्रकार हा दोन व्यक्तींचे सारखे नाव असल्याने तांत्रिक चुकीमुळे घडला आहे. असे त्यांनी आमचे प्रतिनिधी यांचेशी बोलतांना सांगितले. तर अॅड दिपक पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, घडलेला प्रकार हा गंभीर असुन याबाबत महसूल प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा मनस्ताप सहन करावा लागला असुन या प्रकरणी कायदेशीर तक्रार करणार असल्याचे अॅड दिपक पाटील यांनी सांगितले आहे.