मुंबई, दि. 03 :- येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे बंदीजनांकरीता स्मार्टकार्ड फोन सुविधा प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वीत करण्यात आली आहे. अशा प्रकारे स्मार्टकार्ड फोन सुविधा राज्यातील सर्व कारागृहांतील बंदीजनांकरीता उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ही सुविधा उपलब्ध करून देताना कारागृहांची सुरक्षा व महाराष्ट्र कारागृहातील नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. कारागृहातील अंतर्गत सुरक्षा ही कारागृहाची जबाबदारी असल्याने या स्मार्ट फोन सुविधेचा गैरवापर होणार नाही, यासाठी कारागृह अधीक्षक उपाययोजना आखणार आहेत.
यापूर्वी येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे स्मार्टकार्ड फोन सुविधा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली होती. याबाबत येरवडा कारागृहाचा अहवालही प्राप्त झाला आहे. त्याअनुषंगाने राज्यातील सर्व कारागृहात स्मार्टकार्ड फोन सुविधा कार्यान्वीत करण्याबाबत अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, पुणे यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.