एरंडोल येथील सुप्रसिद्ध डॉक्टर विपुल अविनाश शिलाहार व डॉक्टर आरती विपुल शिलाहार यांचे “अविरत्न होमिओपॅथिक क्लिनिक “एरंडोल शाखेला आज दिनांक 8. 10. 2023 रोजी 11 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यांनी 11 वर्ष सतत अविरत एकही रविवार सुटी न घेता अखंडित सेवा देऊन एरंडोल तसेच आजूबाजूच्या परिसरातील रुग्णांची त्यांची मन जिंकली आहेत. डॉक्टर विपुल शिलाहार यांना या कार्यासाठी त्यांची पत्नी डॉक्टर आरती शिलाहार यांची नेहमी साथ मिळाली आहे. डॉक्टर विपुल शिलाहार हे शासकीय होमिओपॅथी रुग्णालयात जळगाव येथे प्रोफेसर असून त्यांच्या पत्नी डॉक्टर आरती शिलाहार या सुद्धा गोदावरी मेडिकल कॉलेज येथे प्रोफेसर आहेत.
त्यांनी दर रविवारी एकही सुट्टी न घेता एरंडोल येथे येऊन रुग्णांची सेवा केलेली आहे. त्याबाबत डॉक्टरांशी माध्यमांनी बोलले असता ,डॉक्टरांनी सांगितले की ,मी तसेच माझ्या पत्नी डॉ.आरती शिलाहार आम्ही सतत आयुष्यभर एरंडोलकर यांची सेवा करत राहू अशी ग्वाही दिली आहे.त्याबद्दल एरंडोल येथील प्रतिष्ठित नागरिक तसेच रुग्ण यांनी त्यांचा सत्कार केलेला आहे. त्यात डॉक्टरांना डी डी एस पी कॉलेजचे चेअरमन अमित दादा, नगरसेवक रवींद्र चौधरी. नगराध्यक्ष मुकुंदसिंग परदेशी, ॲडव्होकेट दीपक पाटील तसेच पोलीस हेड कॉ.रामकृष्ण पाटील यांनी त्यांचा सत्कार करून डॉक्टर दांपत्य यांचे हातून अशीच रुग्णसेवा व्हावी अशी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.