जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे काही रिक्त पदांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 40 जागांवर भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज दि.26 आणि 27 ऑगस्ट रोजी देखील फॉर्म स्वीकारले जातील. GMC Jalgaon Bharti 2023
पदाचे नाव : जनरल नर्सिंग व मिडवाइफरी
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
१) आशा स्वयंसेविका, अपंग, ए.एन.एम. अनाथ तसेच पुरुष उमेद्वार यांना परिपत्रकानुसार व त्यांच्या शैक्षणिक अहर्तेनुसार प्रवेश देण्यात येईल
२) वयोमर्यादा :– दि. ३१/०७/२०२३ रोजी उमेदवाराचे वय १७ पेक्षा कमी व ३५ पेक्षा जास्त असु नये ( उमेदवाराचा जन्म ३१ जुलै २००६ नंतरचा व ३१ जुलै १९८८ पूर्वीचा नसावा.
३) जी. एन. एम. या अभ्यासक्रम प्रवेशासाठी सर्वसाधारण तसेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी देखील १२ वी विज्ञान (जीवशास्त्र, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र सह) किमान ४५% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
४) प्रशिक्षणाचा कालावधी ३ वर्ष
फॉर्म फी :
खुल्या प्रवर्गासाठी रु. ५००/-
मागास प्रवर्गासाठी रु. २५०/-
विद्यावेतन :– शासकीय नियमानुसार
प्रवेश अर्ज दि. २५/०८/२०२३ ते २८/०८/२०२३ या कालावधीत सकाळी १०.०० ते ५.०० वाजेपर्यंत परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, सामान्य रुग्णालय जळगाव येथे उपलब्ध असतील. दि. 26/08 व दि 27/08 रोजी देखील फॉर्म दिले जातील.
संपूर्ण भरलेले अर्ज दि. २५/०८/२०२३ ते २९/०८/२०२३ या कालावधीत सकाळी १०.०० ते ५.०० वाजे पर्यंत परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय सामान्य रुग्णालय जळगांव येथे स्वीकारले जातील. दि.26/08 व दि. 27/08 रोजी देखील फॉर्म स्वीकारले जातील.
आवश्यक कागदपत्रे :
संपूर्ण भरलेल्या अर्जासोबत खालील प्रमाणपत्रांच्या प्रमाणित प्रती जोडणे आवश्यक आहे, तसेच त्या वेळेस मूळ प्रतीसुध्दा दाखविण्यास आणाव्यात.
शाळा / महाविद्यालय सोडल्याचा दाखला
१० वी उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्र
१२ वी उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्र
अर्हताकारी परीक्षा किती प्रयत्नात उत्तीर्ण झाले त्या बाबतचे शाळा महाविद्यालयाचे प्रमाणपत्र (Attempt Certificate )
महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र ( Domicile Certificate)
भारतीय नागरिकत्वाचा दाखला (Nationality Certificate )
जात प्रमाणपत्र ( Caste Certificate)
जात वैधता प्रमाण पत्र ( Caste Validity)
नॉनक्रिमिलेअर दाखला
शासकीय रुग्णालयातील सक्षम वैद्यकीय अधिकारी यांनी प्रमाणित केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र (अर्जासोबत जोडलेल्या विहित नमुन्यानुसार सादर करावे.
आधार कार्ड
राखीव गटातील उमेदवारांनी त्यांची आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करावीत.
निवड करण्यात येणारा उमेद्वार शारीरिक व मानसिकदृष्टया सक्षम असणे आवश्यक आहे. या करिता शासकीय रुग्णालयातील सक्षम वैद्यकीय अधिकारी यांनी प्रमाणित केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र ( अर्जा सोबत जोडलेल्या प्रमाणपत्रानुसार ) सादर करावे.
दि.३०/०८/२०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजे नंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात येईल.
दि.३०/०८/२०२३ रोजी प्रसिध्द झालेल्या गुणवत्ता यादीवर ३१/०८/२०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आक्षेप नोंदवणे बंधनकारक आहे. त्यानंतर आलेले आक्षेपावर कोणत्याही परिस्थितीत विचार करण्यात येणार नाही.
अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी व समुपदेशन संवादास पात्र उमेद्वारांची यादी दि. ०१/०९/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात येईल. (१४) समुपदेशन संवादास पात्र उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रासह दि. ०४/०९/२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय, सामान्य रुग्णालय आवार जळगांव येथे हजर राहावे