मुंबई : सावधान…. तुम्ही लहान सहन अडचण दूर करण्यासाठी ऑनलाईन कर्ज काढत असाल तर यापुढे काळजीपूर्वक हे काम करा….हप्ता भरण्यासाठी लोन अॅपमार्फत ऑनलाईन कर्ज काढणे मुंबईतील एका २४ वर्षीय अभियंत्याला चांगलेच महागात पडले आहे. त्याने घेतलेल्या कर्जापेक्षा अधिकची रक्कम त्याने भरूनही त्याचे मॉर्फ केलेले विवस्त्र अवस्थेतील फोटो व्हायरल करण्यात आले. या विरोधात त्याने वांद्रे पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली आहे.दरम्यान ऑनलाईन कर्ज व्यवहार करतांना यापुढे नागरिकांनी आधीक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
तक्रारदार अभियंता खासगी कंपनीत डेस्कटॉप सपोर्ट इंजिनिअर म्हणून काम करतो. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट रोजी त्याला एलआयसीचा हप्ता भरण्यासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे त्याने प्लेस्टोअरवरून गार्ड क्रेडिट हे अॅप डाऊनलोड केले. त्याच्या माध्यमातून त्याने १३ हजार ५०० रुपयांचे कर्ज मागितले. मात्र, प्रत्यक्षात त्याला ९ हजार ३०० रुपये देण्यात आले. तसेच, ते परत करण्यासाठी सहा व्यवहारांमार्फत २२ हजार ५०० रुपये वसूल करण्यात आले. मात्र, त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी सकाळी नऊच्या सुमारास एका व्यक्तीने फोन करत “तुम्हारा लोन पेंडिंग दिखा रहा है तुम लोन पेड कर दो, असे सांगितले.
कर्ज घेतलेल्या अभियांत्याने त्यास कर्ज तर पुर्ण परतफेड केल्याचे सांगितले आणि त्रास दिल्यास पोलिसात जाईल असं सांगितलं या गोष्टीचा राग आल्याने तेव्हात्याने ‘अब देखो क्या करता हू’ असे म्हणत त्याने फोन कट केला.आणि त्यानंतर तक्रारदाराच्या बॉसच्या मोबाइलवर त्याचे मॉर्फ केलेल्या अवस्थेतील फोटो राहुल ठाकूर नावाने पाठविण्यात आल्याचे त्याला समजले.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्याने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. दरम्यान वांद्रे पोलिसांनी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.