जळगाव,(प्रतिनिधी): शिरसाळा येथील मारुतीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या दोघं चुलतभावांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात दोन्हीजण ठार झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी मुक्ताईनगरजवळील बोहर्डी फाट्यानजीक घडली.भास्कर पांडुरंग कुंभार (१८) आणि लखन पंकज कुंभार (१८, रा. कुंभारवाडा, सावदा) अशी या मृत तरुणांची नावे आहेत.
सकाळी ते शिरसाळा ता. बोदवड येथील मारुतीच्या दर्शनासाठी सावदा येथून दुचाकीने निघाले. बोहर्डी फाट्याजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात भास्कर याचा जागीच मृत्यू झाला तर लखन कुंभार लखन याचा भुसावळ येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू आला आहे.
भास्कर आणि लखन हे चुलतभाऊ होते. दोघे बारावीत शिक्षण घेत घरी कुंभार व्यवसायाला मदत करीत होते. एकाचवेळी घरातील दोन तरुण गमाविल्याने या परिवारावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. अज्ञात वाहनचालकाविरुध्द वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात