जळगाव,(प्रतिनिधी);-भारत राष्ट्रीय समिती (बीआरएस) पक्षाचे नेते तथा तेलंगाणा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची शेतकऱ्यांसाठी असलेल कामाचं धोरण व जनहितासाठी काम करण्याची पद्धत पाहून प्रभावित होऊन पक्षात प्रवेश केला असल्याचे सांगत आगामी विधानसभा निवडणुक जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातून लढणार असल्याचं कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा BRS पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ (लकीअण्णा टेलर } यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.
भारत राष्ट्रीय समिती (बीआरएस ) तेलंगाणा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्रीय समिती (बीआरएस ) पक्षांमध्ये जळगाव जिल्ह्यातील तसेच उत्तर महराष्ट्रातील अनेक आजी माजी राजकारणी दिग्गज प्रवेश करणार असून आगामी सर्व महापालिका,जिल्हा परिषद ,लोकसभा आणि विधानसभा निवडणुका बीआरएस पक्ष स्वबळावर लढविणार असून पक्षाची ध्येय धोरणे लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणत पक्षाचे उमेदवार निश्चित निवडून येतील असा ठाम विश्वास उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक नानासाहेब बच्छाव यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केला . याप्रसंगी जळगाव जिल्हा समन्वयक तथा जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ (लकीअण्णा टेलर } यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी नानासाहेब बच्छाव म्हणाले कि, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडविला असून त्या राज्यातील शेती सिंचनाखाली आणलीय आहे. चंद्रशेखर राव यांचे सरकार शेतीसाठी ६० टक्के निधी खर्च करीत असून त्यामानाने महाराष्ट्र सरकार केवळ १२ टक्के खर्च कृषीसाठी करते .. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या , शेतकऱयांच्या भल्यासाठी आखण्यात आलेले विविध धोरण यावर सरकारकडून निराशा व्यक्त होत आहे. मात्र चंद्रशेखर राव यांच्याकडून शेतकऱयांच्या हिताचे निर्णय तात्काळ घेतले जात असून शेतकऱयांच्या फायद्यासाठी विविध योजना राबविल्या जातात.
महाराष्ट्रात शेतकऱयांची आत्महत्या हि शोकांतिका असून तरुण बेरोजगार , तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी पक्ष कटिबद्ध आहे. ‘अब कि बार किसान सरकार ‘ असा नारा देऊन पक्ष मोठ्या ताकदीने महाराष्ट्र राज्यात उतरला असून चंद्रशेखर राव यांच्या विचारसरणीला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.
आगामी महापालिका,नगरपालिका, जिल्हा परिषद,विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये बीएआरस पक्ष मोठ्या ताकदीने मैदानात उतरणार असून पक्षात आज शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश करून मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे नेतृत्व मान्य केले आहे.
आता माहाराष्ट्रस सरकारने कांदा उत्पादक शेतकर्याना ४० टक्के निर्यात शुल्क लावले असून नाशिक जिल्ह्यात यावरून आंदोलने केली जात आहे. यामुळे कांदा उत्पादक शेकर्त्यांचे नुकसान होता आहे. उत्तर माहाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र शेतकऱयांच्या पिकाला योग्य भाव न मिळालयाने त्यांच्यामध्ये प्रचंड आक्रोश आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिंगाडा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा नानासाहेब बच्छाव यांनी यावेळी दिला. येणाऱ्या सर्व निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याचे आणि भारत राष्ट्रीय समिती पक्ष यासाठी सज्ज असून या पक्षात येण्यास अनेकजण इच्छुक आहेत. त्या सर्वांचा पक्षात प्रवेश होऊन इतर राजकीय पक्षांच्या पायाखालची वाळू सरकेल असे नानासाहेब बच्छाव यांनी सांगितले .
दरम्यान जळगाव शहरातील रस्ते , पाणी , मूलभूत सोयी सुविधा यावरही श्री बच्छाव यांनी प्रतिक्रिया देऊन यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.यांनी केला प्रवेशआज बीआरएस पक्षाचे नानासाहेब बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत आनंदा वाणी (वराड सिम) ,भूषण सोनवणे ,प्रा. सुरेश अत्तरदे , बिपिन झोपे ,भगवान सोनार , दीपक भारुळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.