जळगाव,(प्रतिनिधी) – जिल्ह्यातील अमळनेर तालुक्याचे माजी आमदार गुलाबराव वामनराव पाटील यांचे वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळाने मंगळवार दि. २२ रोजी सायंकाळी ७:३० वाजता निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा २३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता दहिवद, ता. अमळनेर येथून निघणार आहे. सकाळी सात ते आठ त्यांचे पार्थिव साने गुरुजी शाळेच्या प्रांगणात मुख दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
खान्देशची मुलुख मैदान तोफ म्हणून ओळख
गुलाबराव पाटील हे सुरुवातीला जिल्हा लोकल बोर्डात निवडून आले होते. नंतर १९७८ ला पहिल्यांदा पलोदसरकारमध्ये आमदार म्हणून अमळनेर विधानसभा मतदारसंघात निवडून आले. यावेळी अडीच वर्षात सरकार बरखास्त झाले. पुन्हा १९८० ला निवडून आले.ते१९८५ ला काँग्रेसचे अमृतराव पाटील यांनी त्यांना पराभूत केले. नंतर १९९० ते ९५ दरम्यान ते पुन्हा आमदार झाले. असे तीन वेळा ते एकूण १३ वर्षे जनता दलाचे आमदार होते.
त्यांच्या वर साने गुरुजींच्या विचारांचा पगडा होता. शेतकऱ्यांसाठी शिंगाडे मोर्चा, सभागृहातून राजदंड पळवणे आदी भूमिका लक्षवेधी ठरल्या होत्या.त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते गुणवंत पाटील यांचे वडील तर अमळनेर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील यांचे आजोबा होत.

