माझ्या नवऱ्याने माझे न्यूड व्हिडीओ ५०-५० लाख,४७ लाखाला विकले असल्याचा धक्कादायक आरोप अभिनेत्री राखी सावंत यांनी केला असून या आरोपानंतर खळबळ उडाली आहे.अभिनेत्री राखी सावंत ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. दोन वर्षांपूर्वी तिने आदिल खान दुर्रानी सोबत निकाह केला होता त्यानंतर त्यांच्या संसारात वादाची ठिणगी पडली आणि त्यानंतर बरेच वाद निर्माण झाले दरम्यान राखीने पतीवर अनेक गंभीर आरोप केले असून नवरा आदिल यास तुरुंगात पाठवलं होतं मात्र नुकताचं तो तुरुंगातून सुटून आला असून आदिल ने देखील राखी सावंत यांच्या बाबत धक्कादायक खुलासे करून खळबळ उडवली आहे.
आदिलच्या आरोपांना राखीचे उत्तर
नुकतीच आदिल तुरुंगातून सुटून आला असून आता तो बाहेर आहे त्याने राखीवर अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. त्या सर्व आरोपांवर आता राखीने पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे. यावेळी बोलतांना अभिनेत्री राखी म्हणाली की आदिल खान दुर्रानी या माझ्या नवऱ्याने माझे न्यूड व्हिडीओ ५०-५०लाख, ४७ लाखाला विकले. मी हनिमूनला बाथटबमध्ये बसले आहे, आंघोळ करते आहे, आदिल बरोबर बेडवर आहे असे सगळे व्हिडिओ त्याने शूट केले आणि एका अरब माणसाला विकले असल्याचा गंभीर आरोप राखीने आपल्या पती आदिल वर लावल्याने खळबळ उडाली आहे.