दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय केलेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय नौदलात नोकरीची संधी चालून आली आहे. भारतीय नौदल हेड क्वार्टर अंदमान आणि निकोबार कमांड अंतर्गत ट्रेड्समन मेट पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरती अंतर्गत एकूण ३६२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
येत्या २६ ऑगस्ट २०२३ पासून तुम्ही ऑनलाईन माध्यमातून अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०२३ आहे तर अर्ज करण्यासाठी अंदमान निकोबार शासनाच्या या https://www.andaman.gov.in/ अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.
शैक्षणिक पात्रता : १० वी पास किंवा संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय.
परीक्षा शुल्क :
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही.
निवड प्रकीर्या :
या अर्जप्रक्रियेतून पात्र उमेदवारांची १०० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा ही प्रत्यक्ष स्वरूपात होणार असून त्याचे अपशिल वरील लिंक मध्ये दिलेले आहेत. त्यातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड केली जाईल.
नोकरी ठिकाण : अंदमान आणि निकोबार आणि संपूर्ण भारत.
वयोमर्यादा: कमीत कमी १८ ते जास्तीतजास्त २५ वर्षे. नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्जात भरलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळ्यास त्या उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. शिवाय, चुकीची माहिती किंवा बनावट कागदपत्रे वापरणाऱ्या उमेदवारांचे अर्ज निवड प्रक्रियेच्या कोणत्याही पायरीवर फेटाळण्यात येतील अशी सूचना इंडियन नेव्हीच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.