मोदी सरकार विरुद्ध निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येतं ‘वज्रमुठ‘ उभी केली असून मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी सर्वच स्तरावरून मोर्चे बांधणी सुरु आहे, विरोधी पक्षांनी एकत्र येतं ‘इंडिया‘ गठीत करून ‘ताकद‘ उभारून निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयारी सुरु केली आहे. दरम्यान काही तासांपूर्वीच उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त झालेले अजय राय यांनी काँग्रेसचे नेते Rahul Gandhi व Priyanka Gandhi यांच्या निवडणूक लढवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे.
या लोकसभा मतदार संघातून लढणार…
राय यांनी सांगितले की, राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवतील. प्रियांका गांधी यांची इच्छा असल्यास वाराणसीतील प्रत्येक पक्ष कार्यकर्ता कामाला लागेल. म्हणजेच प्रियांका गांधी पंतप्रधान PM Narendra Modi यांच्या विरोधात निवडणूक लढवू शकतात. हा दावा करताना अजय राय यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, सध्या केंद्रीय मंत्री व अमेठीच्या खासदार अस्वस्थ आहेत व जनतेला आता उत्तर पाहिजे, अमेठीच्या विकासासाठी त्यांनी काय केले? आतापर्यंत काही केले नाही.
अमेठीतून या आधी संजय गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. राहुल गांधी यांनीही सलग तीन वेळा अमेठीतून निवडणूक जिंकली होती.अमेठी लोकसभा मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून गेल्या निवडणुकीत या मतदार संघात राहुल गांधींचा भाजपाच्या स्मृती इराणी यांनी पराभव केला होता.
राहुल गांधींच्या ओकप्रियतेत वाढ…
काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांनी पायी चालत ‘भारत जोडो यात्रा’ केल्या पासून त्यांच्या लोकप्रियेत वाढ झाल्याचे बोलले जात आहे.अलीकडच्या काळात मोदी सरकारला विविध प्रश्नावर घेरतांना देखील राहुल गांधी यशस्वी होतांना दिसत आहे.
#rahulgandhi #congress #bjp #india #narendramodi #modi #amitshah #politics #indianpolitics #priyankagandhi #soniagandhi #yogiadityanath #delhi #inc #godimedia #indian #news #indiannationalcongress #memes #namo #covid #rahulgandhimemes #bhfyp #bjpindia #rss #election #andhbhakt #ravishkumar #hindu #uttarpradesh