जळगाव,(प्रतिनिधी)- जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार,,रमेश चोपडे अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव यांनी जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील जनतेला आवाहन केले आहे की,काही समाजकंटकाकडुन द्विजातीय नागरीकांच्या भावना भडकविणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये.
दरम्यान प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात पोलीस प्रशासनाने म्हटले आहे की,दिनांक १८/०८/२०२३ रोजी औरंगाबाद येथुन शर्मा ट्रान्सपोर्टचा कंपनीचा मालवाहू ट्रक क्रमांक UP ९३ AT ८१३५ हा जनावरांची कातडे (चामडे) भरून ट्रक चालक नामे सल्लु खान बाबु खान व क्लिनर नामे मानसिंग श्रीराम कुशवाह हे सदरचे जनावरांचे कातडे लेदर फॅक्टरी कानपुर (उत्तरप्रदेश) येथे प्रक्रीयेकरीता घेवुन जात असताना बांभोरी ता.धरणगाव जवळ काही समाजकंटकाकडुन सदरचा मालवाहू ट्रकचा पाठलाग करुन पाळधी ता. धरणगाव येथे थांबवुन तिथे बेकायदेशीर जमाव जमविण्यात आला होता. त्यावेळी तिथे पोलीसांनी हस्तक्षेप करून सांमजस्य पणे जमलेल्या जमावाला कायदा हातात न घेता कायदेशीर कारवाई करण्याचे आव्हान केले. त्यानंतर सदर ठिकाणी पशुवैद्यकिय अधिकारी यांना घटनास्थळी बोलावून सदर ट्रक मध्ये असलेल्या जनावरांची कातडे (चामडे) यांचे सॅम्पल घेवून तपासणी करीता पाठविले आहे.
सदर ठिकाणी बेकायदेशीर जमलेल्या जमावातील काही समाज कंटकांनी पोलीसांवर दगडफेक करून पोलीस वाहनांची तोडफोड केली तसेच ट्रकमधील चालक नामे सल्लु खान बाबु खान व क्लिनर नामे मानसिंग श्रीराम कुशवाह यांना जिवेठार मारण्याचा प्रयत्न करून मालवाहू ट्रक पेटवून दिला. त्यावेळी पोलीसांनी ट्रकमधील वाहन चालक व क्लिनर याचा जिव वाचवून अग्नीशामक दलाचे मदतीने पेटलेला ट्रक विझविला. सदर घटनेच्या अनुषंगाने धरणगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र.२८९ / २०२३ भादवि कलम ३०७,३५३,३३२, ४३५, १४३, १४७, ४२७ सह सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ चे कलम ३ सह मपोका कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करून १९ आरोपीतांना (समाजकंटकांना) अटक करण्यात आली आहे. तसेच पाळधी ता. धरणगाव येथे सामाजीक वातावरण शांत आहे.
सदर ट्रकमध्ये जनावराचे कातडे (चामडे) असून गोमांस नसल्याची खात्री झाली आहे. तरी जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये व कोणीही कायदा हातात घेवुन शांततेचा भंग करु नये असे जळगाव पोलीस दलातर्फे जनतेला आवाहन करण्यात येत आहे.

