जळगाव, (प्रतिनिधी)- जळगावमधील एलिट क्लबने मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा केला. यावेळी क्लबने 150+ गरजूंना अन्नदान केले. या उपक्रमाचे नेतृत्व कुंदन सूर्यवंशी आणि संघदीप नन्नवरे यांनी केले.आणि त्यांच्यासोबत प्रथमेश सांगळे, पंकज मराठे,केतन पाटील आदी उपस्थित होते.
आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या समाजाप्रती असलेल्या आपल्या जवाबदारी आपण कष्या पद्धतीने पार पाडू शकतो असे या उपक्रमातून दिसून आले.क्लबच्या सर्व युवा सदस्यांनी या उपक्रमासाठी मोठ्या प्रमाणात मदत केली . या उपक्रमाद्वारे एलिट क्लबने सामाजिक बांधिलकी जपली. क्लबच्या या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.एलिट क्लब हा नेहमीच आपल्या सामाजिक कार्यातून समाजात एक आदर्श घडवत आहे .