जळगाव, (प्रतिनिधी) – आज दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी जाणता राजा प्रतिष्ठान संचलित के के इंटरनॅशनल स्कूल मध्ये भारताचा ७७ वा स्वातंत्र्य दिन अतिशय जल्लोष पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. अशोक सैंदाने सर ( JMC Cluster Head ) शाळेचे संचालक श्री. मनोज पाटील सर व सौ. सीमा पाटील मॅडम तसेच पवन पाटील सर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनीषा धबाडे मॅडम व्यासपीठावर उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले . राष्ट्रगीत गायन करण्यात आले.यानंतर कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला.
शाळेतील विद्यार्थ्यांनी पीटी, डंबेल्स, तसेच देशभक्तीपर गीत गायन व सामूहिक नृत्ये सादर केले. तसेच शाळेतील नर्सरी ते सिनियर के.जी. च्या विद्यार्थ्यांनी थोर महापुरुषांच्या वेशभूषा साकारल्या होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. भाग्यश्री पाटील व सौ. अश्विनी सावंत यांनी केले. सर्व शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले.. “वंदे मातरम” ने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.सर्वांच्या उपस्थितित कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

