मुंबई महानगरपालिकेत नोकरी करु इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने २२६ जागांसाठी भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने 4 सप्टेंबर 2023पूर्वी अर्ज करावा लागेल.
या भरतीअंतर्गत पालिकेत कनिष्ठ लघुलेखक पदावर उमेदवारांना काम करण्याची संधी मिळणार आहे. सदर भरतीसाठी पात्र मौखिक चाचणी आणि ऑनलाइन परीक्षेच्या माध्यमातून ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
पदाचे नाव – कनिष्ठ लघुलेखक (इंग्रजी नि-मराठी)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BMC Recruitment 2023)
1. उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम प्रमाणपत्र परीक्षा पहिल्या प्रयत्नांत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कला, विज्ञान, वाणिज्य किंवा तत्सम शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयात्नांत किमान ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
3. उमेदवार १०० गुणांची मराठी भाषा विषयाची इयत्ता दहावी किंवा मराठी विषय असलेली तस्यम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. तसेच, इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
० कनिष्ठ लघुलेखक(इंग्रजी) – इंग्रजी टायपिंग ४० WPM आणि इंग्रजी स्टेनोग्राफी ८० WPM आणि MS-CIT.
० कनिष्ठ लघुलेखक(मराठी) – मराठी टायपिंग ३० WPM आणि मराठी स्टेनोग्राफी ८० WPM आणि MS-CIT.
० उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम, वर प्रोसेसिंग, स्प्रेडशिट, प्रेझेंटेशन, डेटाबेस सॉफ्टवेअर, ई-मेल आणि इंटरनेट यांचे उत्तम ज्ञान असणे अत्यावश्यक आहे.
मिळणारे वेतन – 25,500/- ते 81,100/- रुपये दरमहा
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 सप्टेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – नवी मुंबई
जाहिरात पहा – PDF