मुंबई । देशासह राज्यात सध्या गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून यात दिवसेंदिवस वाढ होतच आहे. दरम्यान, मुंबईमधील टिटवाळा परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पतीची हत्या केल्यानंतर दारू मुळे त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव पत्नीने केला होता.मात्र पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तिच्या बनावाचा भांडाफोड झाला.
काय आहे घटना
टिटवाळा जवळ बल्याणी परिसरात परिसरात प्रवीण मोरे व प्रणिता मोरे हे पती पत्नी राहत होते. प्रवीणला दारूचे व्यसन होते. दारू पिऊन तो पत्नी प्रणिताशी वाद घालायचा. ३ ऑगस्ट रोजी प्रवीण दारू पिऊन घरी आला त्याने प्रणिताशी वाद घालण्यास सुरुवात केली.
याच वादातून संतापलेल्या प्रणिताने प्रवीणची गळा आवळून हत्या केली. हत्येचे कृत्य लपवण्यासाठी प्रणिताने दारू पिल्याने प्रवीणचा मृत्यू झाल्याचे भासवले. प्रवीणच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्याची गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले. टिटवाळा पोलिसांना प्रणितावर संशय आला.
पोलिसांनी प्रणिताला ताब्यात घेत तिची चौकशी केली असता प्रणिताने प्रवीणची गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली. पती दारू पिऊन वारंवार भांडण करत असल्याच्या रागातून पतीची हत्या केल्याची ही कबुली प्रणिताने दिली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणात आरोपी प्रणिता मोरेला पोलिसांनी अटक केली आहे.