मुंबई । राज्यात सुरू असलेल्या राजकीय गदारोळा दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला अचानक रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगू लागल्या होत्या. मुख्यमंत्र्यांचा हा नियोजित दौरा नव्हता. मात्र, आता मुख्यमंत्र्यांनी अचानक पंतप्रधानांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदेंनी प्रतिक्रिया दिली असून कुटुंबाची इच्छा होती म्हणून पंतप्रधानांना भेटलो असे ते म्हणाले आहे.
हे सुद्धा वाचा..
PM किसान योजनेचा 14 वा हप्ता लवकरच ; त्याआधी लाभार्थी यादीत तुमचे नाव याप्रमाणे तपासा
महाराष्ट्र हादरला! बहीण-भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना ; वाचून बसेल धक्का
रेल्वेचा मोठा निर्णय! ट्रेन सुटल्यानंतर 10 मिनिटांनी रिझर्वेशन केलेल्या सीटवर पोहोचावे लागेल अन्यथा…
आज केवळ पंतप्रधानांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. पंतप्रधानांची सदिच्छा भेट घेण्याची माझ्या कुटुंबाची इच्छा होती, त्यामुळे आज आम्ही त्यांना भेटलो. त्यांनी वेळ दिला आणि चांगल्या निवांत गप्पा झाल्या असे शिंदे यांनी म्हणाले.
ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी इर्शाळवाडी घटनेविषयी देखील संवेदना व्यक्त केल्या. तसेच राज्यात सुरू असललेले प्रकल्प, राज्यातील सध्याची परिस्थिती आणि पावसाची परिस्थितीत त्यांनी जाणून घेतली आणि या सर्वांबद्दलच अगदी मोकळेपणाने चर्चा झाली. काल झालेल्या इर्शाळवाडीच्या दुर्घटनेबाबतही त्यांनी संवेदना व्यक्त केली असे शिंदे यांनी सांगितले.

