मुंबई । काल राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळाले. दरम्यान, राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असून आगामी चार ते पाच दिवस पाऊस राहणार असून याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. अंदाज हवामान विभागाने वर्तवला
या जिल्ह्यांना अलर्ट
हवामान खात्याने कोकणातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाने कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे स्थानिक प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई, ठाणे, रायगडमध्ये मेघगर्जनेसह पाऊस असणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याकडून वर्तवला आहे.
जळगावातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस?
दरम्यान, बुधवारी जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी मुसळधार पावसाने नदी नाल्यांना पूर आला. आजही पावसाची शक्यता वर्तविली असून २१ जुलै पासून पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.

