रायगड : रायगड जिल्ह्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली असून मुसळधार पावसामुळे दर कोसळून अख्ख गाव दरडीखाली आली दाबल्या गेल्याची घटना घडली. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून 25 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे.
मात्र शेकडो जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. एनडीआरएफची टीम, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन रात्रीच मदतकार्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुर्घटनास्थळी रवाना झाले आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली आहे. रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय. या मुसळधार पावसामुळे खालापूरच्या इर्शालगडावरील चौक गावापासून 6 किलोमीटर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासींची वाडी आहे. येथे बुधवारी रात्री दरड कोसळल्याची घटना घडली आहे.
प्राथमिक माहितीनुसार मलब्याखाली अंदाजे 100 पेक्षा लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. तर यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून 25 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
एनडीआरएफ (NDRF) आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सकाळी पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं आहे. ही दुर्देवी काल रात्री 10.30 ते 11 वाजता घटना घडली. या गावात सुमारे 40 घरे असून ही सर्व घरे दरडीखाली आली आहेत.
पालकमंत्री उदय सामंत घटनास्थळी, दादा भुसे, गिरिश महाजन घटनास्थळी दाखल झाले असून, आदिती तटकरे यांच्याकडूनही कडूनही प्रशासनासह बचावकार्य करणाऱ्या पथकांना महत्वपूर्ण सूचना करण्यात आल्या आहेत.

