मुंबई । राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या दूधाचा दर निश्चिच करण्यासाठी दूध दर निश्चिती समितीची स्थापना केली होती. या समितीनं आपला अहवाल सादर केला असून त्यानुसार आता राज्यातील शेतकऱ्यांच्या दुधाला 34 रुपये दर द्यावाच लागणार आहे.
विशेष म्हणजे जी दूध डेअरी गायीच्या दुधाला 34 रुपयांपेक्षा कमी दर देईल त्या दूध डेअरीवर आता कारवाई होणार आहे. या समितीच्या अहवालामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हे पण वाचा….
राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर ; पहा कुणाला कोणतं खाते मिळाले?
दरीत ओढत नेत महिलेवर आठ जणांनी केला आळीपाळीने बलात्कार : बुलढाण्यातील खळबळजनक घटना
खुशखबर..! राज्य शासनाच्या नगरपरिषद संचालनालया मार्फत मेगाभरती जाहीर
काय आहे समितीचा अहवाल?
राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या दूधाचा दर निश्चिच करण्यासाठी दूध निश्चिती समितीची स्थापना केली होती. या समितीनं आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार राज्यातील शेतकऱ्यांच्या दुधाला आता कमीत कमी 34 रुपये दर द्यावाच लागणार आहे. गायीच्या दुधाला किमान 34 रुपये दर द्यावा लागणार आहे. त्यापेक्षा कमी दर देणाऱ्या दूध डेअऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशूपालन करतात. मात्र अनेकदा दूधाला चांगला दर मिळत नसल्यानं त्यांना मोठा फटका बसतो. मात्र आता दरनिश्चिती करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.