नोएडा । उत्तरप्रदेशातील नोएडाच्या बादलपूर परिसरात एका ८ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला होता. या मुलाच्या हत्त्येबाबत धक्कादायक माहिती समोर आलीय. पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता, चक्रावून टाकणारी माहिती समोर आली आहे. आईनेच त्याची हत्या केल्याचं उघड झालं.
बादलपूर येथील रहिवासी असलेल्या एका महिलेने आपला ८ वर्षीय मुलगा अंकित हा २ जुलै रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत केली होती. पोलिसांनी मुलाचा शोध घेतला असता, ५ जुलै रोजी त्याचा मृतदेह जुनवई परिसरात आढळून आला. एवढ्या लहान मुलाची हत्या कोण करू शकतं? असा प्रश्न पोलिसांना पडला होता. मात्र आईनेच त्याची हत्या केल्याचं उघड झालं.
पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलाच्या आईचे शेजारी राहणाऱ्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. पती कामावर आणि मुलगा शाळेत गेल्यावर महिला आपल्या प्रियकराला घरी बोलवायची. पण एकेदिवशी मुलगा शाळेतून लवकर घरी आला त्याने आपल्या आईला शेजारच्यासोबत नको त्या अवस्थेत बघितलं.
दरम्यान, बदनामीच्या भीतीने आईने प्रियकर ओमपालच्या सांगण्यावरून मुलगा अंकितची हत्या केली होती. ज्यामध्ये महिलेच्या दीर मानक याने देखील तिला मदत केली. हत्येनंतर तिघांनी मिळून अंकितचा मृतदेह दूर जंगलात फेकून दिला. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणात आतापर्यंत ४ जणांचा अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. आईनेच मुलाची हत्या केल्याचं समोर येताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

