मुंबई । भारतीय शेअर बाजारात सध्या तेजी पाहायला मिळत आहे. आज गुरुवारी (13 जुलै) शेअर बाजारात नवा विक्रम पाहायला मिळाला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) च्या सेन्सेक्सने आज पहिल्यांदाच 66 हजारांची पातळी ओलांडली आहे. त्याच वेळी, एनएसईच्या निफ्टीनेही प्रथमच 19,500 चा टप्पा पार केला. गेल्या महिन्यात सेन्सेक्सने प्रथमच ६४ हजारांची पातळी ओलांडली होती. अशाप्रकारे, सेन्सेक्सने अवघ्या दोन आठवड्यात 2,000 हजारांहून अधिक वाढ नोंदवली आहे.
24 सप्टेंबर 2021 रोजी सेन्सेक्सने प्रथमच 60 हजारांची पातळी ओलांडली होती आणि आता तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीत त्याने 6,000 हून अधिक अंकांचा प्रवास केला आहे. व्यवहारादरम्यान गुरुवारी सेन्सेक्सने ६६,०४९.४५ या ऐतिहासिक उच्चांकाला स्पर्श केला.
या समभागांमध्येही वेगवान वाढ
BSE वर 30 समभाग सूचीबद्ध आहेत. सध्या, टाटा समुहातील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), इन्फोसिस आणि टेक महिंद्रा सर्वात वेगाने वाढत आहेत. 2 टक्क्यांहून अधिक वाढीसह, तिन्ही सेन्सेक्सच्या सर्वाधिक लाभधारकांमध्ये आहेत. बाजारातील तेजी यापुढेही कायम राहू शकेल, असा अंदाज बाजार तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
हे सुद्धा वाचा..
मुलाने शेजारी तरुणासोबत आईला नको त्या अवस्थेत बघितलं, बदनामीच्या भीतीने मातेने जे केलं ते भयंकर
अरे देवा..! लठ्ठपणामुळे मुले ‘या’ धोकादायक आजाराला बळी पडत आहेत
VIDEO । ऑनलाइन फ्री फायर गेमचे भयंकर व्यसन, 7वीत शिकणाऱ्या मुलाचे मानसिक संतुलन बिघडले
या 5 कारणांमुळे शेअर बाजाराने मोठी झेप घेतली
>> अमेरिकेतील महागाई कमी झाल्याचा परिणाम
>> डॉलर निर्देशांकातील घसरणीचा फायदा
>> जागतिक बाजारपेठेत चांगली वाढ
>> आयटी शेअर्समध्ये चांगली वाढ
>> विदेशी गुंतवणूकदारांकडून सतत खरेदी
पेनी स्टॉक: 1 वर्षात शेअर्स हजारो टक्क्यांनी वाढले
पेनी स्टॉक: 1 वर्षात शेअर्स हजारो टक्क्यांनी वाढले, पुढे पहा…
12 जुलै रोजी शेअर बाजार लाल चिन्हावर बंद झाला होता.
मागील ट्रेडिंग सत्रात बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 223.94 अंकांनी किंवा 0.34 टक्क्यांनी घसरून 65393.90 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 55.10 अंकांनी किंवा 0.28 टक्क्यांनी घसरून 19384.30 वर बंद झाला.

