औरंगाबाद | औरंगाबाद शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. बहिणींसोबत खेळत असताना गॅसवरील गरम पाणी अंगावर पडून भाजलेल्या दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. शिद्रा हारून शेख (2 वर्षे) असे चिमुकलीचं नाव असून या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे पण वाचा..
मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त हुकला, आता कधी होणार विस्तार..
पोरांनो.. नोकरीचा चान्स सोडू नका : महाराष्ट्र कृषी विभागमध्ये बंपर भरती
दलिताला मारहाण, नंतर चप्पल चाटायला लावली ; घटनेचा VIDEO व्हायरल
नेमकी घटना काय?
शिद्राचे कुटुंब पडेगावात कासंबरी दर्गा परिसरात राहते. हारुण शेख हे बाहेरून घरी येत होते, त्यामुळे त्यांच्या अंघोळीसाठी पत्नीने पाणी गरम करुन ठेवले होते. तर हारुण यांच्या पत्नी बाथरुममध्ये होत्या. पाणी गरम ठेवले होते. तिथे गॅसजवळ हारुण यांच्या तीन मुली खेळत होत्या.
त्यापैकी तिसऱ्या क्रमांकाच्या मुलीच्या अंगावर खेळता खेळता गरम पाणी सांडले. दरम्यान मुलीचे ओरडण्याचा आवाज आल्याने आईने तत्काळ धाव घेतली. यात शिद्रा गंभीर भाजली होती. तिच्यावर घाटीत उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या घटनेची नोंद छावणी पोलिसांत करण्यात आली आहे. या घटनेने शेख कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

