भडगाव । महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरिक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेची अंतिम यादी जाहीर करण्यात आलेली त्यात भडगाव तालुक्यातील वडजी येथील शेतकरी असलेल्या रूमसिंग गुलचंद परदेशी यांची कन्या विद्या परदेशी हिने घवघवीत यश मिळविले आहे. विशेष म्हणजे विद्या परदेशी हीने कोणत्याच प्रकारचे क्लासेस न लावता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. विद्याची पोलीस उपनिरिक्षकपदी निवड झाली असून तिने वडजी गावातून प्रथम महिला पीएसआय होण्याचा मान मिळवला आहे.
आई वडिल सर्वसाधारण शेतकरी कन्या विद्या हिने मोठा भाऊ महेंद्र शिक्षण घेत असतांना परिक्षाचा अभ्यास करीत असतांना त्याच्या मार्गदर्शनाने कोणतेच क्लास न लावता एमपीएससीच्या परीक्षेत विद्या परदेशीने गावातून प्रथम महिला पीएसआय होण्याचा मान मिळवला आहे. जेमतेम शेती असलेल्य रुमासिंग परदेशी यांनी मुलांचा शिक्षणावर भर देऊन मुलीला पोलीस अधिकारी होण्याच्या स्वप्नांना आकार दिला. विद्याच्या यशाबद्दल तीच्यावर गावातून व अभिनंदाचा वर्षाव होत आहे. भडगावचे पत्रकार अशोक परदेशी, वाडे ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच ऊषाबाई अशोक परदेशी यांनी या विदयार्थीनीसह कुटुंबाचेही अभिनंदन केले आहे.
विद्या परदेशी ही रोज सकाळी सायंकाळी रस्त्यावर धावत सराव करायची. ती प्रचंड मेहनत घेत होती. तीने चंग बांधला होता कि, मी उपनिरीक्षक पदावर विराजमान होईलच. मुलगी विद्याची तळमळ पाहुन बापालाही राहावले नाही. वडील रुमसिंग परदेशी हे देखील मुलीसोबत सरावासाठी सकाळ संध्याकाळी रस्त्यावर धावायचे. यानिमित्त रूमसिंग यांच्याही शरीराला व्यायाम मिळाला. मात्र मुलीसोबत बापही रस्त्यावर धावला अन् मुलीला यश मिळाले.

