मुंबई । अजित पवारांनी बंड करत भाजप-शिंदे गटाच्या साथीनं उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत आठ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड उलथा-पालथ झाली. दरम्यान, बंडखोरीनंतर आज अजित पवार यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी मोठे गौप्यस्फोट केले आहेत.
सकाळी उठलं विचार केला अन् शपथ घेतली असं होत नाही. आम्ही सगळ्या बाबींचा विचार केला. कायदेशीर बाबी तपासून पाहिल्या. मगच राष्ट्रवादी भाजपसोबत आली, असं छगन भुजबळांनी म्हटलं आहे.पहाटेचा शपथविधी का झाला, त्यामागचं कारण जनतेला कळलं पाहिजे, असं छगन भुजबळ म्हणालेत.
नागालँडमध्ये राष्ट्रवादी पक्ष भाजपसोबत गेला. मग आम्हीही राष्ट्रवादीसोबत आलो आहोत. आम्हालाही पाठिंबा द्या. शरद पवारसाहेब तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. सरकारच्या माध्यमातून चांगलं काम करू, असं भुजबळ म्हणाले.
अजित पवार यांच्यासोबत 40 पेक्षा जास्त आमदार आहेत. त्यांच्या प्रतिज्ञापत्रावर सह्या झाल्या आहेत. बैठकीला सर्व आमदार आले नाही. कारण काही विदेशात आहे, काही आजारी आहेत तर काही वाहतूक कोंडीत अडकलं आहे, असा दावा छगन भुजबळ यांनी केला.