जळगाव । राज्यातला गेल्या 7 दिवसातला पाऊस चांगला झाला आहे. गेल्या काही दिवसात चांगला पाऊस झाला असला तरी अजूनही अनेक जिल्ह्यांत पाऊस सरासरी पेक्षा खूप कमी आहे. IMD च्या अंदाज नुसार राज्यात येत्या काही दिवस पाऊस सक्रिय राहील. दरम्यान, राज्यात आजही मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होणार आहे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
या जिल्ह्याना अलर्ट जारी
भारतीय हवामान विभागाने आज गुरूवारी रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे, त्यामुळे या भागात आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळू शकतो. दुसरीकडे कोल्हापूर, सिंधुदुर्ग, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात म्हणावा तसा जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणी खोळंबली आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

