पुणे । पुण्यातुन एक धक्कादायक घटना समोर आलीय. नुकताच झालेल्या दर्शना पवार हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता राहिली. एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीवर पोलीस ठाण्यासमोरच कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या प्रेम प्रकरणाचा राग मनात धरुन या तरुणाने तरुणीवर कोयता हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमपीएससीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर तिच्याच मित्राने कोयत्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात या तरुणीसोबत तिचा आणखी एक मित्र जखमी झाला आहे. तरुणीवर हल्ला करणारा तरुण आणि तिचा मित्र हे देखील एमपीएससीचे शिक्षण घेत आहेत.पुण्यातील सदाशिव पेठेत या तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलीस चौकीजवळ ही घटना घडली.
हे पण वाचा..
धक्कादायक! पोलीस कर्मचाऱ्याने रागात विजेच्या डीपीत हात घातला अन्… घटना CCTV कैद
धक्कादायक! पाचोऱ्यात प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या
दुचाकीवर बसवून जंगलात नेलं, नंतर महिलेसोबत घडलं भयंकर, पारोळा हादरले
राज्यातील या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा ; हवामान खात्याकडून अलर्ट जारी
पीडित तरुणी कॉलेजला निघाली होती. त्याचवेळी आरोपीने तिच्या मित्रावर देखील हल्ला केला. हल्ल्यानंतर ही तरुणी आपला जीव वाचवण्यासाठी रस्त्यावरुन पळू लागली. तिच्या मागे आरोपी कोयता घेऊन लागला होता तरी देखील कुणीच तिच्या मदतीला धावून आले नाही.
जखमी अवस्थेत तरुणीला धावताना पाहून एक तरुण तिच्या मदतीला धावून आला. कोयता हातात असलेला तरुण मुलीच्या डोक्यात वार करणार तेवढ्यात लेशपाल जवळगे नावाचा तरुणाने आरोपीच्या हातातील कोयता पकडला आणि त्याला रोखले. त्यानंतर इतर लोकं पुढे आले आणि हल्लेखोर तरुणाला त्यांनी चोप दिला. त्यानंतर पोलीसांनी हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतलं.
जुन्या प्रेम प्रकरणाचा राग मनात धरुन या तरुणाने तरुणीवर कोयता हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात तरुणी आणि तिचा मित्र जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

