जळगाव: महामार्गावर होणारे अपघात दिवसेंदिवस वाढतच चालले असल्याचे दिसतेय. अशातच अपघाताची एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आलीय. अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नी ठार झाल्याची घटना नशिराबादजवळ महामार्गावर घडली. दाम्पत्यासोबत असलेला तीन वर्षांचा मुलगा सुदैवाने अपघातातून बचावला. शेनफडू बाबुराव कोळी (वय ३५, रा. सामरोद ता. जामनेर), भारती कोळी (वय ३२) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातातीन रुद्र नावाचा चिमुकला बचावला.
जामनेर तालुक्यातील सामरोद येथे शेनफडू बाबुराव कोळी हे त्यांची पत्नी भारती कोळी आणि मुलगा रुद्रसोबत बहिणीला मुलगा झाल्याने त्याला पाहण्यासाठी दुचाकीने आसोदा येथे आले होते. रात्रभर मुक्काम केल्यानंतर शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास कोळी हे पत्नी व मुलासह घराकडे सामरोदला जाण्यासाठी निघाले.
हे पण वाचाच..
प्रियकराला भेटला गेली अन् महिलेसोबत घडला भयंकर प्रकार, राज्याला हदारून सोडणारी घटना..
रेल्वचा आणखी एक भीषण अपघात, दोन मालगाड्या एकमेकांवर आदळल्या ; अपघाताचा Video व्हायरल
Railway Job : परीक्षेशिवाय रेल्वेत 3624 पदांची मेगाभरती ! 10वी+ITI पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी..
या ठिकाणाहून घराकडे जाण्यासाठी जवळचा रस्ता कुठला म्हणून शेनफडू कोळी यांनी मेहुण्याकडे विचारणा केली. त्यावर मेहुण्याने त्यांना नशिराबाद, कुऱ्हा मार्गे सामरोदला जाता येईल असे सांगितले. त्यानुसार शेनफडू कोळी त्यांच्या कुटुंबासह दुचाकीने नशिराबाद मार्गे निघाले.
काही अंतर कापल्यानंतर नशिराबाद येथे महाजन हॉटेलजवळ महामार्गावर शेनफडू कोळी यांच्या दुचाकीला आयशर वाहनाने धडक दिल्यामुळे ते जागीच कोसळले. त्यात भारती कोळी यांचा जागीच मृत्यू झाला. तर शेनफडू कोळी व त्यांचा मुलगा रुद्र याला नशिराबाद पोलीस आणि नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचारादरम्यान शेनफडू याचा मृत्यू झाला आहे. रुद्रला किरकोळ मार लागला असून तो सुखरूप आहे.
अपघातानंतर चिमुकला रुद्र रडत होता. त्यानंतर तो एकटक सर्वांकडे पाहत होता. कदाचित त्याला त्याच्या आई वडिलांचा मृत्यू झाला हेदेखील कळलं नसावं. या दुर्दैवी अपघातामुळे चिमुकला मुलगा पोरका झाला असून त्याच्याकडे पाहून अनेकांचा डोळे पाणावले होते. . या अपघातप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरु आहे.

