जळगाव,(प्रतिनिधी)- शहराचे लोकप्रिय आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांचा 58 वा वाढदिवस काल साध्या पद्धतीने साजरा करण्यात सालाबाद प्रमाणे यंदाही आमदार राजू मामा यांनी वाढदिवसाच्या दिवशी सहपरिवारसह देवदर्शन घेतले 13 जुन मंगळवार रोजी आ.सुरेश भोळे राजु मामा मा महापौर सौ सीमाताई भोळे चिरंजीव विशाल भोळे व सुनबाई डॉ सौ जुही भोळे सहपरिवार यांनी पंढरपूर येथे पहाटे पांडुरंगाचे दर्शन घेतले व आ. सुरेश भोळे यांनी दर्शन घेऊन शहराच्या विकास कामांसाठी ना. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी दिल्ली येथे प्रयाण केले.
दरम्यान दुपारी संत नामदेव महाराजांचे जन्म स्थळ असलेल्या केशवराय श्री नामदेव महाराज मंदिरात सह परिवार दर्शन घेतले या प्रसंगी संत नामदेव महाराज चे १६ वे वंशज ह भ प मुकुंद महाराज व १७ वंशज एकनाथ महाराज यांनी श्री विशाल भोळे व डॉ सौ जुही भोळे यांनी केशवरायाची सपत्नीक पुजा केली व त्यानी सांगितले कि पुढच्या वर्षी राजु मामा साहेब हे पुन्हा एकदा आमदार म्हणून पांडुरंगाच्या व श्री नामदेव महाराजा च्या दर्शनाला यावे अश्या ब्रह्मध्रनी द्वारे आशीर्वाद व शुभेच्छा दिल्यात व सौ सीमाताई भोळे व परिवाराला त्यांनी सुंदर मनमोहक श्री संत नामदेव महाराज ची मूर्ती सप्रेम भेट दिली असे मनोज भांडारकर यांनी कळविले.