Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी बातमी ; राज्यात सहा ठिकाणी शिवसृष्टी उभारणार – पर्यटनमंत्री

najarkaid live by najarkaid live
June 14, 2023
in राजकारण
0
मोठी बातमी ; राज्यात सहा ठिकाणी शिवसृष्टी उभारणार – पर्यटनमंत्री
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई, दि.१४ : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची माहिती पुढील पिढ्यांना व्हावी तसेच पर्यटकांना राज्याच्या प्रेरणादायी इतिहासाची माहिती व्हावी यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यामार्फत राज्यात शिवनेरी, गोराई, बुलढाणा, औरंगाबाद, नाशिक व रामटेक येथे सहा ठिकाणी शिवसृष्टी, उद्यान, संग्रहालय व शिवकालीन थीम पार्क उभारणार आहे. या सर्व कामांसाठी ४१० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून एक वर्षभरात सर्व कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी माहिती पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. मंत्रालयातील दालनात आयोजित पत्रकार परिषदेत पर्यटन मंत्री श्री.लोढा बोलत होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले, राज्यातील पर्यटनाला चालना मिळावी व त्यातून रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी राज्य शासन व पर्यटन विभाग विविध उपक्रम राबवत आहे. राज्यात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवायचा असतो, हेच लक्षात घेवून छत्रपती शिवरायांच्या इतिहासाबाबत सर्व माहिती या शिवसृष्टीतून पर्यटन व शिवप्रेमींना मिळण्यास मदत होणार आहे. शिवसृष्टीच्या कामाबाबत जनतेच्या आलेल्या सूचनांनुसार या कामामध्ये बदल करण्यात येईल. तसेच विविध लोगो स्पर्धांचे आयोजनही करण्यात येईल. शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज बाल संस्कार संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या कामासाठी ७० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

गोराई (मुंबई) येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेवर असलेली अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली व आता त्या ठिकाणी २५ एकर जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्ध कौशल्य व आरमार संदर्भात प्रेरणा देणारे संग्रहालय (वॉर म्युझियम) उभारले जाणार आहे. बुलढाणा येथे राजमाता जिजाऊ संग्रहालय, औरंगाबाद येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय, नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराज राजकौशल्य संग्रहालय, रामटेक येथील छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संग्रहालयासाठी प्रत्येकी ५० कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे.या शिवसृष्टी, उद्यान आणि म्युझिअम, थीम पार्कच्या माध्यमातून पुढील पिढ्यांना राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा तसेच महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास अनुभवता येईल.

थीम पार्क,आचार्य चाणक्य म्युझियम

भगूर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर थीम पार्कसाठी १५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून सावरकरांचे पूर्ण जीवन चरित्र व अंदमान-निकोबार कारागृहातील प्रमुख घटना यांचा यामध्ये समावेश असेल. कार्ला – आचार्य चाणक्य म्युझियमसाठी ७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून आचार्य चाणक्य नीतीचे ५ प्रखंड राजनीती, अर्थनीती, सामाजिक नीती, युद्ध नीती, धर्म नीती व याचसोबत ७  दिवस ते १ महिन्याचा अभ्यासक्रम शिकविण्यात येईल. शिर्डीला पायी जाणाऱ्या साईभक्तांकरिता पडघा (ता.भिवंडी, जि.ठाणे) येथे  निवास व्यवस्थेसाठी ३ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

प्रत्येक शाळा व महाविद्यालयात युवा पर्यटन क्लब

नव्या पिढीला पर्यटनस्थळांचे जतन आणि संवर्धनाचे महत्त्व कळावे यासाठी लवकरच प्रत्येक शाळा व महाविद्यालयात युवा पर्यटन क्लब स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळा व महाविद्यालयानजीक असलेल्या पर्यटनस्थळांचे जतन करावे, स्थानिक ठिकाणी जास्तीत जास्त पर्यटक यावेत यासाठी पर्यटन विभागामार्फत हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे पर्यटनमंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

अंगणवाडीत योग दिवस साजरा होणार

महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, २१ जून हा जगभरात “आंतरराष्ट्रीय योग दिवस” म्हणून साजरा केला जातो. आरोग्याच्या दृष्टीने योग साधनेचे महत्त्व अनन्य साधारण आहे. राज्यातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत विशेष करुन महिला वर्गामध्ये योग साधनेची गोडी वृद्धींगत व्हावी, यासाठी प्रत्येक अंगणवाडी स्तरावर, अंगणवाडी क्षेत्रातील किशोरवयीन मुली, नोंदणी झालेल्या महिला (गरोदर महिला वगळून) यांचेसाठी अंगणवाडीत प्रशिक्षणाचा उपक्रम आयोजित करुन ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा करण्यात येणार आहे.

Spread the love
WhatsApp Image 2021-06-27 at 3.19.13 PM
https://najarkaid.com/wp-content/uploads/2021/10/Kantai-Netralaya-Jalgaon.mp4
ADVERTISEMENT
Previous Post

अरबाज खानच्या एक्स गर्लफ्रेंडने ओलांडल्या मर्यादा ; ग्लॅमरस फोटोने इंटरनेटचा वाढवला पारा

Next Post

भाजप -शिंदे गटात ठिणगी पडण्याची शक्यता… भाजपच्या ‘या’ नेत्याचे थेट शिंदेवर निशाणा

Related Posts

मोठी अपडेट ;शिंदे गटाच्या प्रत्येक आमदारांकडून विधानसभाध्यक्षांना ६,५०० पानांचे प्रतिज्ञापत्र सादर

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीबाबत वेळापत्रक जाहीर

September 27, 2023
किरीट सोमय्या यांनी दहीहंडीत फुगडी खेळून व तरुणांसोबत भर पावसात डान्स करून केली धमाल ; व्हिडीओ प्रचंड व्हायरल

किरीट सोमय्या यांनी दहीहंडीत फुगडी खेळून व तरुणांसोबत भर पावसात डान्स करून केली धमाल ; व्हिडीओ प्रचंड व्हायरल

September 8, 2023
महाविकास आघाडीकडून एकनाथराव खडसे लोकसभा २०२४ चे उमेदवार ?

महाविकास आघाडीकडून एकनाथराव खडसे लोकसभा २०२४ चे उमेदवार ?

September 6, 2023
जळगावात भाजपला धक्का ; शरद पवारांच्या उपस्थितीत ‘या’ माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश

जळगावात भाजपला धक्का ; शरद पवारांच्या उपस्थितीत ‘या’ माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश

September 5, 2023
खा.शरद पवार आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर ;मिनिट टू मिनिट दौरा वाचा

खा.शरद पवार आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर ;मिनिट टू मिनिट दौरा वाचा

September 5, 2023
दोन हजारांच्या नोटा परत करा, उरले काहीच दिवस…. अन्यथा…

काँग्रेसने शब्द पाळला ; ‘या’ राज्यात लाखो महिलांना महिन्याला २ हजार तर बेरोजगारांना 3 हजार रुपयांची मदत

August 31, 2023
Next Post
भाजप -शिंदे गटात ठिणगी पडण्याची शक्यता… भाजपच्या ‘या’ नेत्याचे थेट शिंदेवर निशाणा

भाजप -शिंदे गटात ठिणगी पडण्याची शक्यता... भाजपच्या 'या' नेत्याचे थेट शिंदेवर निशाणा

ताज्या बातम्या

नीती आयोगाच्या मदतीने मुंबईचा कायापालट करणारा मास्टर प्लॅन ; महत्वपूर्ण बैठक संपन्न

२९ तारखेला शासकीय सुटी जाहीर ; शासनाकडून अधिसूचना जारी

September 27, 2023
गोपीचंद पुना पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न

गोपीचंद पुना पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न

September 27, 2023
मोठी अपडेट ;शिंदे गटाच्या प्रत्येक आमदारांकडून विधानसभाध्यक्षांना ६,५०० पानांचे प्रतिज्ञापत्र सादर

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीबाबत वेळापत्रक जाहीर

September 27, 2023
‘त्या’ वक्तव्या विरुद्ध चंद्रशेखर बावनकुळे यांचा मराठी पत्रकार संघातर्फे निषेध

‘त्या’ वक्तव्या विरुद्ध चंद्रशेखर बावनकुळे यांचा मराठी पत्रकार संघातर्फे निषेध

September 27, 2023
राज्यात ‘या’ तारखेपासून मान्सून परतणार !

राज्यात ‘या’ तारखेपासून मान्सून परतणार !

September 26, 2023
मोठी अपडेट ;शिंदे गटाच्या प्रत्येक आमदारांकडून विधानसभाध्यक्षांना ६,५०० पानांचे प्रतिज्ञापत्र सादर

विधानपरिषदेच्या मुंबई, कोकण विभाग पदवीधर तसेच नाशिक आणि मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर

September 26, 2023
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us