राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात काल सर्व वर्तमानपत्रांमध्ये झळकली होती.या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे फोटो झळकले होते मात्र महाराष्ट्र भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना वगळण्यात आल्याने या जाहिरातीतील मजकूर भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी थेट आणि उघडपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात मोठी ठिणगी पडण्याची शक्यता दिसून येत आहे.
प्रसिद्धी माध्यमातून जाहिरात आल्यापासून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. बाकी कोणी नाही, अस तर या जाहिरातीतून दाखवण्याच्या प्रयत्न होतं नाही… अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.या प्रकरणावर प्रतिक्रिया देतांना भाजप खासदार अनिल बोंडे यांनी थेट आणि उघडपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हटले खासदार अनिल बोंडे
भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधतांना म्हटलं की,’बेडूक किती फुगला तरी हत्ती बनत नाही’, अशा शब्दात सर्व्हेच्या त्या जाहिरातीवर प्रतिक्रिया दिली आहे.बोंडे यांनी एक प्रकारे शिंदे यांची बेडकाशीच तुलना केल्याने भाजप व शिंदे गटात ठिणगी पडण्याची व्यक्त केली जात आहे.
शिंदे चांगले मुख्यमंत्री आहेत. राज्याच्या जनतेने त्यांना स्वीकारले आहे. मात्र त्यांना आजूबाजूचे चुकीचे सल्ले देत आहे, असं सांगतानाच शिंदे यांना ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र वाटायला लागलाय, मात्र देवेंद्र फडणवीस आज असा चेहरा आहे जो बहुजनासाठी काम करतो. सर्व गोष्टीला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं आहे, असं अनिल बोंडे यांनी म्हंटलं आहे.