भुसावळ । उन्हाळ्याची सुटी तसेच शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर पुन्हा नव्याने जळगाव जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. मात्र याच दरम्यान, भुसावळात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शाळेचा पहिला दिवस होता. प्रार्थना म्हणताना एका १३ वर्षीय मुलाला अचानक चक्कर आले आणि त्याचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला.
भुसावळ येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ही घटना घडलीय. सुयोग भूषण बडगुजर (वय १३) असं या मयत विद्यार्थ्याचं नाव असून तो आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होता.
सुयोग हा सकाळी शाळेत गेला. शाळेचा पहिला दिवस असल्याने तसेच खूप दिवसांनंतर पुन्हा मित्र भेटणार असल्याने त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. मात्र, त्याच्यावर काळाने झडप घातली.
हे पण वाचाच..
DRDO मध्ये तरुणांसाठी नोकरीची संधी.. 181 पदावर निघाली भरती
ईडीने अटक करताच मंत्री ढसाढसा रडला ; नेमकं प्रकरण काय?; पाहा VIDEO
मंत्रिमंडळातून ‘त्या’ पाच मंत्र्यांना डच्चू मिळणार प्रकरणावर शिंदेच्या शिवसेनेने जाहीर केली भूमिका
शाळेची प्रार्थना सुरू असताना सुयोगला अचानक चक्कर आले आणि तो जमिनीवर कोसळला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी त्याला तात्काळ खासगी दवाखान्यात नेले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.
सुयोगला दोन ते तीन महिन्यांपूर्वी “ईडिओपॅथिक पलमोंनरी अर्टरी हायपरटेन्शन” हा आजार असल्याचे निदान झाले होते. याबाबत त्याला दोन कार्डिओलॉजिस्ट डॉक्टरांना दाखवले होते, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. सुयोगची अजाराबाबतची फॅमिली हिस्ट्री देखील आहे. सुयोगच्या वडिलांचे आठ महिन्यापूर्वी याच आजाराने निधन झाले होते, तर आजोबा पण याच आजाराने वारले असल्याची माहिती दिली. सुयोग बडगुजरला हृदयाची संबंधित समस्या होती. त्यामुळे सुयोग बडगुजर याची दोन दिवसांनी पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट होती. अशी सुद्धा माहिती मिळाली आहे.