भडगाव,(प्रतिनिधी)-शहरातील चाळीसगाव रोड वरील साई ऑटो सेंटर (बजाज शोरुम) येथून बजाज कंपनीच्या ३० मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लांबविल्या. यामधे १६ प्लॅटिना १४ पल्सर गाड्या ह्या चोरीचा गेल्याची घटना घडली असून ही घटना शोरुम मधील स्टॉक रजिस्टर चेक केल्यानंतर उघडकीस आली असून एकूण २३ लाख रुपये किंमतीच्या मोटासायकल चोरी झाल्या आहे. या बाबत भडगाव पोलिस स्टेशनला अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक महिती अशी की, शहरातली चाळीसगाव रोड वरिल साई ऑटो सेंटरचे संचालक रावसाहेब केशव पाटील रा. भडगाव वय-56 वर्षे यांनी फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नेहमीप्रमाणे सकाळी 10-00 वाजता साई ऑटो शोरुम ला जावुन कामावर देखरेख तसेच दुचाकी वाहनांच्या विक्री बाबत तपशिलाची माहिती घेत असतो. दिनांक ११/०६/२०२३ रोजी दुपारी ३ वाजेनंतर मी तसेच माझे सोबत शोरुमचे मँनेजर महेश लोटन पाटील, रा. भडगांव अशांनी शोरुम मधिल दुचाकी वाहनांच्या स्टॉक ची पडताळणी करणेबाबत ठरविले व पडताळणी केली.
त्यानंतर पडताळणी दरम्यान आम्हास काही दुचाकी वाहने कमी दिसुन आली. त्याबाबत आम्ही आमच्या कडील स्टॉक एन्ट्री व सेल झालेल्या दुचाकी वाहनांबाबत अधिकची पडताळणी केली असता, आम्हास सदर स्टॉकमध्ये ३० दुचाकी वाहने कमी आढळु आली. त्यानंतर आम्ही खात्री केली असता शोरुम मधिल बजाज कंपनीची ३० दुचाकी वाहने चोरी झाले बाबत लक्षात आले.
सदर बजाज कंपनीच्या १६ प्लॅटिना व १४ पल्सर अश्या ३० दुचाकी एकुण २२,७७,९८० रु. किंमतीचा एकुण मुद्देमाल विना पासिंगच्या बजाज कंपनीच्या मोटार सायकली, माझ्या मालकिच्या साई ऑटो शोरुम मधुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी वेळोवेळी काढुन चोरुन नेल्या आहेत.
या बाबत भडगाव पोलिस स्टेशनला फिर्यादी रावसाहेब केशव पाटील रा. भडगाव यांच्या फिर्यादवरून गु. र. न.१७१/२०२३ भा.द.वी कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. हे कॉ. नितीन रावते हे करीत आहे.

