एरंडोल,(प्रतिनिधी)- तालुक्यात खरीप हंगाम २०२३ च्या बियाणे विक्री पार्श्वभूमीवर कृषी विभाग एरंडोल यांच्याकडून अचानकपणे एरंडोल शहर व तालुक्यातील मुख्य गाव कासोदा कृषी केंद्रांवर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन तपासणी केली.
पथकाने विशेष तपासणी मोहीम राबवली. मोहिमेत शेतकरी मागणी प्रमाणे आवश्यक असणारे सर्व कापूस व इतर सर्व पिकांच्या वाणांची विक्री केंद्रातील साठा नोंदणी वही शिल्लक नुसार विक्री करण्याची सक्त ताकीद देण्यात आली. तसेच सर्व कृषी निविष्ठा परवाना नियम व कायद्यानुसार आढळून आलेल्या उनिवा बाबत लेखी खुलासे
कृषी केंद्र कडून मागविण्यात आले आहेत.
या मोहिमेत जिल्हा गुणवता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे एरंडोल तालुका कृषी अधिकारी शरद बोरसे , पं.स. कृषी अधिकारी भरत मोरे , कृषि सहायक कुंदन पाटील, विजेंद्र महाजन, व मुरमुरे यांचेसह क्षेत्रीय कर्मचारी हजर होते