महाराष्ट्र वन विभागाने वनरक्षक पदांच्या 2138 जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया उद्या म्हणजेच 10 जून 2023 पासून सुरु होणार आहे. तसेच अर्ज करण्याची अंतिम दिनांक 30 जून 2023 ही आहे.
पदाचे नाव : वनरक्षक
काय आहे पात्रता?
01) उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (12 वी) ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
02) अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील. 03) माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
04) नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा- यांचे पाल्य असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील. (टिप:- नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे संबंधात वरील प्रयोजनाकरिता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलिस अधिकारी यांचे कडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र विचारार्थ घेण्यात येईल.)
05) अर्ज स्वीकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे. 06) मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.
हे पण वाचा..
घाई करा! RBI मध्ये पदवीधरांसाठी विविध पदांवर बंपर भरती
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत IB मार्फत 797 पदांवर भरती सुरु, आजच करा अर्ज
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात मोठी भरती सुरु ; ७वी ते १० वी उत्तीर्णांना नोकरीचा चान्स
वयाची अट : 18 वर्षे ते 27 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय / अनाथ/ आ.दु.घ. – 900/- रुपये, माजी सैनिक – शुल्क नाही]
पगार : 21,700/- रुपये ते 69,100/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची अंतिम दिनांक 30 जून 2023
जाहिरात पहा : PDF