मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
दरम्यान, शरद पवार यांना आलेल्या धमकीप्रकरणी खासदार सुप्रिया सुळेंकडून मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अशा धमक्या आल्या असतील तर गृहमंत्रालयाने याची तातडीने दखल घ्यावी. शरद पवारांना धमकी येणं दुर्दैवी आहे. राजकारणात मतभेद जरुर असतात. मात्र, इतक्या खालच्या स्तरावर जाऊ नये, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा..
खुशखबर! खाद्यतेलाच्या किरकोळ किमतीत 10 रुपयांनी कपात
महाराष्ट्रात केंद्रप्रमुख पदाच्या 2384 जागांवर मेगाभरतीची घोषणा : एक लाखाहून अधिक पगार मिळेल
धक्कादायक! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तरुणीला पळवले; पाहा VIDEO…
राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक पेजवरून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यावर नर्मदाबाई पटवर्धन असं नाव आहे. शरद पवार भाX खाव तुझा लवकरच दाभोळकर होणार, अशी धमकी या फेसबुकवरून देण्यात आली आहे. तर सौरभ पिंपळकर याने ट्विटर अकाऊंटवरून शरद पवार यांना धमकी दिली आहे. आयुष्यभर सुपारी कात्रत खाल्ल्यामुळे औरंगजेबाच तोंड मरताना वाकडं होऊन मेलं म्हणते हे खरं आहे का? असं असेल तर इतिहास पुनरावृत्ती करणार म्हणजे, अशी धमकी सौरभ पिंपळकर या ट्विटर अकाऊंटवरून ही धमकी देण्यात आली आहे.