अररिया । सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. बिहारमधील अररिया गावात हा प्रकार घडला असून लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नव्या नवरीला पळवून नेले. आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून मुलीच्या भावांनीच हे कृत्य केले असून या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. व्हिडिओ पाहून असे वाटते की, एखाद्या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे.
नवरी मुलगी ओरडत होती, किंचाळत होती तरीही त्या तरुणांनी तिला तिच्या सासरच्या घरातून पळवून नेले. हा सगळा प्रकार गावातील अनेकजण पाहत होते. मात्र त्या तरुणांना आडवण्याची हिंमत झाली नाही. आता तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत.
https://twitter.com/kumarprakash4u/status/1665626959903174656
या प्रकरणाबाबत अपहरण झालेल्या मुलीच्या सासरच्यांनी मुलगा व सुनेचा ऑनर किलिंग अंतर्गत खून झाल्याची भीती व्यक्त करत बथनाहा ओ.पी.मध्ये निवेदन देऊन न्यायाची मागणी केली.या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. बिहारमध्ये काहीही होवू शकते असे म्हणत काही जणांनी संताप व्यक्त केला आहे तर काही जणांनी तरुणांवर कडक कारवाई करण्याचीही मागणी केली आहे.

