कोल्हापूर : एका आक्षेपाहार्य स्टेट्सवरून कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून हिंदुत्ववादी संघटनेतील व्यक्ती मोर्चा काढत रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी हजारो लोक मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा सुरू असतानाच जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यास सुरुवात झाली आहे. ता. पोलिसांच्या लाठीमारामुळे एकच गोंधळ उडाला.
नेमका प्रकार काय?
कोल्हापूरमध्ये आक्षेपार्ह स्टेटसवरून वाद निर्माण झाल्यानंतर आज सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकत्र आले. जमाबंदी आदेश आणि पोलिसांनी बंद मागे घेण्याचं केलेलं आवाहन झुगारून हे आंदोलन करण्यात आलं. मात्र, पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मोर्चाच्या ठिकाणी प्रचंड मोठा बंदोबस्त ठेवला होता. तसेच जिल्ह्यातील संवेदनशील भागातही मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
हे पण वाचा..
“बिपोरजॉय” चक्रीवादळच संकट! जळगावसह या जिल्ह्यांमध्ये वादळी पावासाचा इशारा
कोल्ड्रिंगमध्ये चक्कर येण्याचं औषध टाकून वहिनीला पाजलं ; नंतर दिराने केलं भयंकर कृत्य
जळगाव पुन्हा हादरला! धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून
मात्र परिस्थिती चिघळल्याने पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात येत आहे.कोल्हापुरातील वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाष्य केलं आहे. “गोष्टी आम्हाला समजताहेत. जे चुकीचे आहे ते खपवून घेतले जाणार नाही. अचानकपणे औरंगजेब, टिपू सुलतान यांचे राज्यातील विविध जिल्ह्यात उदात्तीकरण होणे हा काही याेगायाेग नाही. हे आम्हाला स्पष्ट दिसत आहे. विराेधी पक्षाकडून वारंवार दंगली घडविण्याचा प्रयत्न होतोय. तसेच औरंगजेबचे उदात्तीकरण कसे होत आहे याचा तपास सुरु असल्याचं, फडणवीसांनी म्हटलं आहे.