देशात महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहे. याच दरम्यान, भावासारख्या दिरानेबहिणीसोबत असं काही केलं आहे जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
नेमकं काय घडलं?
या महिलेचा तिच्या पतीविरूद्ध न्यायालयात खटला सुरू आहे. त्यामुळे ही महिला 26 मे रोजी कोर्टात तारखेसाठी आली होती. त्यावेळी तिच्या दिराने काही खोटं कारण देत गोड बोलून तिला गाडीत बसवलं आणि सोबत घेऊन गेला. यादरम्यान आरोपी दिराने कोल्ड्रिंगमध्ये चक्कर येण्याचं औषध टाकत तिला प्यायला दिलं. नराधमाने आपल्या पाच साथीदारांसह तिच्यावर बलात्कार केला.
दरम्यान, या धक्कादायक प्रकारानंतर महिलेनं तिचा दिर आणि पाच जणांविरुद्ध पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये आरोप करण्यात आला आहे की, दिराने फसवणूक करत आपल्या साथीदारांसह रेप केला आणि दुसऱ्या दिवशी 27 मे रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्यांनी तिला बसस्थानकात सोडून पळ काढला. दरम्यान, या घटनेनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील एटा शहरातील आहे.