जळगाव/मुंबई । शेतकरीसह सर्वसामान्य लोक मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र मान्सूनची प्रतीक्षा आणखी काही दिवस करावी लागणार आहे. त्यापूर्वी राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जळगावसह चार जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईकडून देण्यात आला आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना काळजी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.
मागील काही दिवसापासून राज्यात वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले असून यात गेल्या तीन चार दिवसापासून राज्यातील तापमानात बदल झाल्याने तापमानाचा पारा किंचत घसरला आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी राज्यातील अनेक ठिकाणी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला होता.
अशातच पुढील ३ ते ४ तासात जळगाव, नाशिक, अहमदनगर, छ. संभाजीनगर या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह वादळी पावासाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
हे पण वाचा..
अति भयंकर ! नराधम पित्याचे केला पोटच्या चिमुकलीवर अत्याचार
मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळ विस्तारात जळगाव जिल्ह्यातील ‘या’ नावांची चर्चा
१०वी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी! पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर
RBI ने घेतला मोठा निर्णय! आता तुम्हाला ही सुविधा मिळणार
या भागात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, ३० ते ४० किमी प्रतितास या वेगाने वादळी वारे वाहतील, असाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना काळजी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.