जळगाव दि 5,- डॉ. उल्हास पाटील कृषी, अन्न तंत्रज्ञान व कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय जळगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत आज पर्यावरण दिन साजरी करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिक्षण संशोधक संचालक डॉ. ए.पी.चौधरी तर अध्यक्षस्थानी कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पूनमचंद सपकाळे, कल्याण अधिकारी प्रा.आर. डी चौधरी उपस्थित होते.यावेळी प्राध्यापक सुरेंद्र इंगोले व प्राध्यापक निलेश सदार यांनी पर्यावरणाचे महत्त्व स्वयंसेवकांना सांगितले. यांनी पर्यावरणाविषयी माहिती सांगून वाढते प्रदूषण कसे कमी करता येईल याविषयी सांगितले.
प्लास्टिकचा वाढता प्रभाव आणि त्याचा होराना विपरीत परिणाम आपल्या शरीरासाठी किती घातक आहे याची माहिती दिली. कार्यक्रमचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा. करण बनसोडे यांनी केले.कार्यक्रमानंतर स्वच्छता अभियान व वृक्ष लागवड कार्यक्रम घेण्यात आला तसेच प्रभात फेरी काढून स्वयंसेवकांना निसर्गा निरीक्षण करून आपल्या परिसरामध्ये वृक्ष व पक्षी यांची ओळख झाली.कार्यक्रम यशस्वीते साठी प्राध्यापक रुंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.