राज्यात सुमारे २०० पेक्षा जास्त वनपरिक्षेत्राधिकारी (RFO) च्या बदल्यांमध्ये गैरप्रकार झाल्याची चर्चा होतं असून वनविभाग मात्र याबाबत ‘एक्शनमोड’ मध्ये दिसत आहे बदल्यांमध्ये झालेल्या अनियमिततामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी होण्याची शक्यता आहे.RFO अधिकाऱ्यांच्या बदली प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर व काही ठिकाणी तर अधिकारी रुजू झाल्यानंतर प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या बदली आदेशाला स्थगिती देण्याचा प्रकार वन विभागात पहिल्यांदाच घडला आहे,यामुळे हे बदली प्रकरण राज्यभरात चर्चेत आहे.
नेमकं काय आहे प्रकरण…
वन खात्याने ३१ मे २०२३ रोजी ३९ सहाय्यक वनसंरक्षक (एसीएफ) यांच्या बदल्या केल्या, तर १२ जणांना आहे त्याच जागेवर मुदतवाढ दिली. यात काही एसीएफच्या बदल्या प्रादेशिक टू प्रादेशिक, तर काही जणांना पुन्हा तोच विभाग दिल्या प्रकरणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रारी आल्याने या बदल्यांमध्येही अर्थकारण झाल्याची चर्चा थेट मंत्रालयात होत आहे.त्यामुळं या बदल्यांना देखील ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
बदल्यांमध्ये गैरप्रकार व अनियमितता झाल्याप्रकरणी प्रधान मुख्य वनसंरक्षक वाय.एस.पी. राव यांनी केलेल्या बदली प्रकरणात चौकशी होणार असल्याचं बोललं जातं आहे.पीसीसीएफ राव आणि एपीसीएफ बिश्वास यांना आरएफओंच्या बदल्यांची फाईल घेऊन जावे लागणार आहे. अनियमितता कुठे झाली? याबाबतची सखोल चौकशी केली आहे .
भाजपच्याच चार आमदारांची वनमंत्र्याकडे तक्रार करण्यात आली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार परदेशात असताना या बदल्या पैशांच्या मोबदल्यात केल्याचा आरोप आहे. दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांनी “माझ्या अनुपस्थितीमध्ये बदल्या झालेल्या नाहीत. बदल्यांसंदर्भात जे अधिकार आहेत मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. बदल्या या गुणवत्तेच्या आधारावर तुम्ही तुमच्या स्तरावर पारदर्शक पद्धतीने करा असे मी आदेश दिलेले आहेत. आर्थिक देवाणघेवाणीची चर्चा नव्हती. यामध्ये काही आमदारांनी अधिकाऱ्यांविषयी गंभीर तक्रारी केल्या आहेत म्हणून मी माझ्या विभागाला सूचना केली, त्याची सगळी माहिती घेऊन चौकशी करा दोषी आढळल्यास कारवाई करणार असल्याचे संकेत वनमंत्र्यांनी दिले आहेत.