पुणे : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल लागला. यावर्षी पुन्हा एकदा मुलींनी हुश्शार असल्याचं दाखवून दिलं आहे. यंदा दहावीचा निकाल 93.83 टक्के इतका लागला. गेल्यावर्षी हा निकाल 96.94 टक्के इतका होता.
दहावीच्या परीक्षेला एकूण 15 लाख 29 हजार 666 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 14 लाख 34 हजार 898 विद्यार्थी पास झाले. मुलींची टक्केवारी 95.87 तर मुलांची टक्केवारी 92.5 इतकी आहे. राज्यातील 43 शाळांचा निकाल शुन्य टक्के लागला आहे. तर 100 टक्के निकालांची शाळा संख्या 6 हजार 844 इतकी आहे. 29.4 टक्के शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
हे पण वाचा..
राज्यात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट ; हवामान खात्याने वर्तविला हा अंदाज
खाली कार्पेट, वर रस्ता, ठेकेदाराने केलेल्या बनावटरस्त्याचा पर्दाफाश ; व्हिडीओ व्हायरल
बदलत्या हवामानात मुले पडू शकतात या 3 आजारांना बळी
विभागवार निकालाची टक्केवारी
पुणे 95.64
नागपूर 92.5
औरंगाबाद 93.23
मुंबई 93.66
कोल्हापूर 96.73
अमरावती 93.22
नाशिक 92.22
लातूर 92.67
कोकण 98.11