केरळच्या स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन बसमध्ये एक लाजिरवाणा प्रकार घडला. बस मध्ये एका तरुणाने आपल्या शेजारी असलेल्या तरुणीसमोर हस्तमैथून करण्याचा संतापजनक प्रकार केला आहे. मात्र शेजारील तरुणीने बसमध्ये आरडाओरडा करत त्याची पोलखोल केली.
तरुणाचं हे कृत्य थेट सर्वांसमोर आणण्यासाठी पीडितेने थेट आपल्या फोनमध्ये ही घटना रेकॉर्ड केली. संबंधित तरुणीने या बाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केल्यावर तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.
केरळच्या स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन या बसमध्ये पीडित तरुणी आणि आरोपी एकमेकांच्या शेजारी बसले होते. यावेळी तरुणाने थेट आपल्या पॅन्टचे बटन उघडत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. यावेळी तो शेजारच्या सीटवर असलेल्या तरुणीला स्पर्श करत होता.
https://twitter.com/sirajnoorani/status/1659653300915146757
हा घाणेरडा प्रकार पाहून तरुणीचा संताप झाला. तरुणाचं हे कृत्य थेट सर्वांसमोर आणण्यासाठी पीडितेने थेट आपल्या फोनमध्ये ही घटना रेकॉर्ड केली. यावेळी तरुण आपण काही केलंच नाही असं म्हणू लागला.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बस थांबवून पोलीसांत तक्रार करण्यासाठी जात असताना रस्त्यावर तरुण बस कंडक्टर यांच्यात हातापायी झाली. तसेच तरुणाने तेथून पळ काढला. ही संपूर्ण घटना पीडितेने पोलिसांना सांगितली. मंगळवारी तरुणाचा शोध घेत पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

