नाशिक : नाशिकमध्ये मन सुन्न करणारी घटना घटना घडली आहे. बेकरी पदार्थ तयार करण्याच्या विद्युत पीठ मळणी करणाऱ्या यंत्रात अडकल्याने ३ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नाशिकमधील पंचवटीच्या इंद्रकुंड परिसरात घडली. रिहान शर्मा असं मृत बालकाच नाव असून याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिहान शर्मा गुरुवारी रात्री नऊ वाजता आपल्या घराजवळ खेळत होता. यावेळी बेकरीतील विविध पदार्थ एकजीव करण्यासाठी वापरण्यात येणारी गिरणी मशीन ठेवण्यात आलेली होती, मात्र काम बंद असल्याने ती मशीन बंद होती.
हे पण वाचा..
बसच्या सीटवर बसून तरुणाचं घाणेरड कृत्य, तरुणीने व्हिडिओ काढत केली पोलखोल
भाजप-शिंदे गटातील युतीत फूट? शिंदे गटाचे खासदार म्हणाले, हे अजिबात मान्य नाही..
अधिकाऱ्यांचा IPhone धरणात पडला, नंतर त्याने जे केलं ते वाचून तुम्हीही संतापाल..
मात्र खेळताना रिहानचा तोल गेल्याने तो या यंत्रात पडला. त्याच्या धक्क्याने मळणी यंत्र सुरू झाली त्यातल्या पात्यांसहित बेल्टमध्ये अडकून रिहान गंभीर जखमी झाला. दरम्यान त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे इंद्रकुंड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.