मुंबई : राज्यातील हवामानात यंदाच्या उन्हाळ्यात वेगळंच हवामान पाहायला मिळालं. मार्च नंतर एप्रिल महिन्याने पावसाचा सर्व उच्चांक मोडल्यानंतर मे महिन्याच्या सुरुवातीला वातावरणात काहीसा गारवा होता. मात्र, काहीच दिवसात मे महिन्यात कडक उन्हाळा पाहायला मिळाला. सध्या राज्यातील बहुतेक भागांमध्ये उष्णतेनं नागरिकांना हैराण केलं आहे.
अशातच हवामान खात्याने काही जिल्ह्यांत उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला असून दुसरीकडे विदर्भात मात्र अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.पुढील 2-3 दिवस विदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा..
अखेर बच्चू कडू यांना मंत्री पदाचा दर्जा जाहीर ; सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी
सिनेसृष्टी पुन्हा हादरली! फेम अभिनेत्रीचं कार अपघातात निधन
सशस्त्र सीमा बलात बंपर भरती जाहीर ; 10वी,12वीच्या उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी संधी
अजबच ! जळगावात महिलेने दिला २६ बोटांच्या बाळाला जन्म
इतर काही ठिकाणी ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. हवेतील आर्द्रता वाढल्याने वातावरण ढगाळ राहील. राज्यात काही ठिकाणी पाऊस पडेल मात्र तीव्रता कमी असेल. पुढील आठवडा पुण्यातील वातावरण अंशतः ढगाळ असणार आहे.
जळगाव जिल्ह्यातही पाऊस येणार नाही, मात्र ढगाळ वातावरण होऊ शकतं. दरम्यान, शनिवारी ज्येष्ठ महिना सुरु झाल्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. मात्र, 26 तारखेला काही प्रमाणात ढगाळ वातावरण होणार आहे.
तर विदर्भात मात्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य भारतात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं विदर्भात ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज आहे. यामुळे विदर्भात तापमान 40 अंशापर्यंत खाली येणार आहे. परंतु, 26 तारखेनंतर तापमानात पुन्हा वाढ होणार आहे.