यावल : जळगावात एका बाळाचा जन्म झाला. या बाळाचा जन्म होताच सगळीकडे त्याची चर्चा होऊ लागली. त्याचं कारणंही तितकच खास होतं. एका महिलेची नुकतीच प्रसूती झाली असून तिच्या नवजात बाळाला हातापायाची मिळून तब्बल 26 बोटं आहेत. ही वैद्यकीय इतिहासातील दुर्मिळ घटना असल्याचा दावा डॉक्टरांकडून केला जात आहे. दरम्यान, जन्मलेले बाळ आणि बाळाची आई सुखरूप आहेत. ज्योती बारेला (वय २० रा, झिरन्या जि. खरगोन, मध्यप्रदेश) असं या दुर्मिळ बाळाला जन्म देणाऱ्या मातेचे नाव आहे.
ज्योती बारेला या महिलेला प्रसूतीसाठी शनिवारी मध्यरात्री यावल तालुक्यातील न्हावी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिची वैद्यकीय तपासणी केली. पहाटेच्या सुमारास ज्योती बारेलाची प्रसूती झाली. मात्र, ज्या बाळाचा जन्म झाला होता, ते पाहून डॉक्टर तसेच रुग्णालयातील कर्मचारी, तसेच बाळाचे नातेवाईक यांना आश्चर्याचा धक्काच बसला.
हे पण वाचा..
अभिनेत्री प्रियांका चौधरीने इन्स्टाग्रामवर शेअर केले बोल्डनेस फोटो
जळगाव जिल्ह्यातील ‘या’ चार विभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
भीषण अपघाताने महाराष्ट्र पुन्हा हदरला : 8 जण ठार, 13 जण गंभीर
खळबळजनक! भुसावळ मुलाने केली आईची व पत्नीची हत्या
सामान्यतः हातापायाचे मिळून २० बोटे असतात. जे बाळ जन्माला आले त्याच्या हातापायाला तब्बल २६ बोटे आहेत. या नवजात बालकाच्या दोन्ही हाताला प्रत्येकी सहा बोटे आणि दोन्ही पायाला प्रत्येकी सात बोटे असे एकूण २६ बोटे या बाळाला आहे. विशेष म्हणजे या बाळाला जन्म देणारी माता व तसेच हे बालक हे दोघे सुखरूप असून दोघांची प्रकृती चांगली आहे.
दरम्यान, २६ बोटे असलेल्या बाळ जन्माला आल्याची वार्ता वाऱ्या सारखी परिसरातील गावांमध्ये पोहचली. त्यामुळे या दुर्मिळ म्हटल्या जाणाऱ्या बालकाला पाहण्यासाठी अनेकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.